%@LANGUAGE="VBSCRIPT" CODEPAGE="65001"%>
बारा 'योगायोगाच्या गोष्टी', बारा 'खरी झालेली स्वप्ने', स्वप्न या विषयावरील शास्त्रीय संशोधनात्मक दोन लेख, निरनिराळ्या व्यक्तींना आलेली 'भविष्याची प्रचिती' सांगणाऱ्या तेरा कथा आणि 'साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे' हे दर्शविणाऱ्या दहा सत्यकथा. या पुस्तकातील सर्वच गोष्टी खऱ्या, प्रत्यक्ष घडलेल्या होत्या, काही व्यक्ती हयात होत्या, माहिती 'वस्तुस्थिती' होती. त्याबद्दलचे पुरावेही उपलब्ध होते.
आठवले यांच्या चौफेर वाचनाचा आणि सखोल अभ्यासाचा आवाका किती अफाट होता आणि त्यांची बहुश्रुतता आणि गुणसंचयी वृत्ती कशी जागती होती हे या पुस्तकातील लिखाणावरून दिसून येते.