%@LANGUAGE="VBSCRIPT" CODEPAGE="65001"%>
स्तोत्र मंत्र आणि संगीत यातून घडणारी 'नादब्रह्माची उपासना', ओंकार, तंत्र, मंत्र, यंत्र, चक्र, वनस्पती, योग, सिद्धी या अनेकविध मार्गांनी प्राप्त होणारी 'प्राणशक्ती', भगवद्गीतेचे महात्म्य, काही बुद्धिमान, कलाकार, विचारवंत, तत्ववेत्ते म्हणून महान आणि काही आपल्यातुपल्या सारखे सामान्य आयुष्य जगतानाही निस्वार्थीपणे, गाजावाजा न करता काही लोकोपयोगी कार्य सहजपणे करणारे म्हणून महान अशा काही वैशिष्ठ्यपूर्ण व्यक्तींचा परिचय अशा २७ लेखांचा हा संग्रह.
आठवल्यांच्या 'गायत्री प्रकाशना'चे हे पहिले पुस्तक. शीर्षक ज्ञानेश्वरीतील ओवीतून घेतले आहे हे लक्षात आले असेलच.