१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

आई मला क्षमा कर

फिल्मिस्तानमध्येच आठवले यांच्या एका सहकार्याने दिग्दर्शित केलेल्या आई मला क्षमा कर' या चित्रासाठी त्यांनी गीते लिहिली आणि त्यात एक ख्रिश्चन पाद्र्याची भूमिकाही केली. राम कदम यांचेच संगीत होते. त्यातील सुधीर फडके यांच्या आवाजातील 'आई आई ए आई' हे गाणे ऐकलेच पाहिजे असे आहे. त्यातील 'नाचते काही तरी गे अंतरी माझ्या नवे' हे द्वंद्वगीत अतिशय वेगळे आणि म्हणून वैशिष्ठ्यपूर्ण आहे. सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी ते गायले आहे.